(रत्नागिरी / वैभव पवार)
रत्नागिरीतील मुलीला वारंवार मेसेज पाठवून, तिचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या पुण्यातील तरुणाला मुंबई येथून अटक करण्यात आले आहे. ही कामगिरी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे. दशरथ सिद्धराम गायकवाड उर्फ वनराज आश्विन देशमुख (३२ वर्षे रा. संतोषनगर, पाण्याचे टाकीजवळ, शनिमंदिरसमोर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
या बाबतची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार संशयित आरोपीवर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 500,504,506 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66( इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचे इंस्टाग्राम आयडीवर त्याचे इंस्टाग्राम आयडी च्या वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंट वरून चॅटिंग करून तसेच फिर्यादी यांना वारंवार व्हिडिओ कॉल करून फिर्यादी यांचे अश्लील अवस्थेतील फोटो काढून ते इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित करून प्रसारित करून तसेच व्हाट्सअप द्वारे अनेकांना पाठवून प्रसारित करून फिर्यादी यांची बदनामी केली, तसेच फिर्यादी यांना त्यांचे वडील व भावाला शिवीगाळ केली याबाबतची फिर्याद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली.
गुन्ह्यातील आरोपी दशरथ सिद्धाराम गायकवाड उर्फ वनराज अश्विन देशमुख हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याचा पुणे येथील परिसरात तपास करत असताना तो मिळून येत नव्हता तसेच त्याचा मोबाईल बंद होता. त्याच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही माहिती मिळून येत नव्हती. गुन्ह्यातील आरोपी दशरथ सिद्धाराम गायकवाड उर्फ वनराज अश्विन देशमुख हा देवनार चेंबूर मुंबई येथे असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाल्याने नमूद आरोपी याचा देवनार चेंबूर मुंबई परिसरात जाऊन शोध घेण्यात आला. तेथे असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले.
मुंबईवरून त्याला गुन्ह्याचे कामी रत्नागिरी येथे अटक करण्यात आली. आरोपी याचे ताब्यातून त्यांनी गुन्ह्यात वापर केलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला. आरोपी याने फिर्यादी यांचे प्रमाणे इतर मुलींची देखील सोशल मीडिया, इंस्टाग्राम, whatsapp अकाउंट वर चॅटिंग तसेच व्हिडिओ कॉल करून अनेक मुलींचे अश्लील फोटो सोशल मीडियावर सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे तपासात निष्पन्न झालेले असून आरोपी याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे
सदर कारवाई रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल वैभव मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल भैरवनाथ सवाईराम, पोलीस हेडकॉन्स्टेबल मंदार मोहिते, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश गायकवाड यांनी केलेली आहे.