(चिपळूण)
ऑनलाइन पद्धतीने लॅपटॉप खरेदीत चिपळुणातील तरुणाची ३ लाख ११ हजार रुपयांनी फसवणूक झाली. चिपळूण पोलिसांनी अमन कुमार (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही.) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद विठ्ठल गजानन काणेकर (२४, रा. कापसाळ, चिपळूण) याने दिली आहे. त्याने अमन कुमारकडे लॅपटॉपच्या ऑनलाईन खरेदीसाठी ३ लाख ११ हजार रुपये दिले होते. परंतु, अमन कुमार याने लॅपटॉप न देता फसवणूक केली.