(रत्नागिरी)
चुलत बहिणीच्या प्रेम प्रकरणाबद्दल घरात समजावून सांगत असताना तिथे आलेल्या चौघांनी तरुणाला मारहाण केली. ही घटना रत्नागिरी शहरातील भाटीमिऱ्या येथे रविवारी रात्री घडली. याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल जोशी, सुशांत जोशी, सुशील जोशी आणि एक महिला, अशी गुन्हा दाखल केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात ओंकार दिनेश कुरधुंडकर (२७) याने शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री १० वाजता ओंकार हा आपल्या राहत्या घरी त्याच्या चुलत बहिणीच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजावून सांगत होता.
त्याचवेळी शेजारीच राहणाऱ्या चौघांनी तेथे येत आमच्या विशालचे नाव का घेतोस, अशी विचारणा केली. त्याच रागातून सुशील जोशीने ओंकार याच्या डोक्यात नारळाच्या झावळीने मारहाण केली. अन्य तिघांनीही ओंकारला मारहाण केली.