(संगमेश्वर)
महिलेचा नवरा गोवा येथे कामाला असल्याने, त्याचा गैरफायदा घेत तरूणाने महिलेसह चुलत भावाला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला. अश्लील चित्रफीत दाखवणाऱ्या या तरूणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ ऑगस्ट रोजी तालुक्यात घडली आहे.
अश्लील चित्रफित दाखवणाऱ्या विरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोस्को २१२ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयित मुंबईला कामाला असतो. तो काही दिवसापूर्वी गावाला आला असताना त्यांनी हे घृणास्पद कार्य केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी करीत आहेत.