( संगमेश्वर / प्रतिनिधी )
जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. गेल्या चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कडवई मुस्लिम मोहल्ल्यातील साजिदा अहमद जुवळे याच्या घरावर शेजारी राहणाऱ्या सिकंदर मुल्ला यांचे फणसाचे झाड कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले.
सुदैवाने झाड पडण्यापूर्वी घरातील सदस्य आतल्या खोलीत असल्याने कोणालाही इजा झाली नाही परंतु घराच्या दोन खोल्याची कौले व पाण्याची टाकी फुटून सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. कौले फुटल्याने घरात पावसाचे पाणी घुसून घरातील वस्तूंचे नुकसान झाले. यावेळी तलाठी ऑफिसच्या किशोर तांबे व सहकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला यावेळी उपसरपंच दत्ताराम ओकटे उपस्थित होते.