(कोल्हापूर)
सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना कागल तालुक्यातील चिमगांव येथे घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगाव येथील आंगज कुंटूबीयातील दोन सख्ख्या बहिण-भावांचा केकमधून विषबाधा होऊन मृत्यू झाला. तर त्यांच्या आईलाही विषबाधा झाल्याची घटना मंगळवार ३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी घडली.
श्री रणजित नेताजी आंगज यांचा मुलगा श्रेयस वय वर्षे ४आणि मुलगी काव्या वय वर्षे ७ अशा दोघा सख्ख्या बहीण-भावाचा पेस्टी केक खाल्यावर जूलाब उलट्या झाल्यानंतर त्यांतच उपचारादरम्यान त्याचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
कागल तालुक्यातील चिमगाव येथील आंगज कुटुंबियांनी एकत्रित केक खाल्यानंतर सकाळच्या सुमारास श्रेयस रणजित आंगज (वय ४), काव्या रणजीत आंगज (वय 6) व मुलांच्या आईला उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने या तिघांना उपचारासाठी मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान श्रयेश व काव्या यांचा मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास काव्याची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे तिला कोल्हापूर येथील प्रमिलाराजे रुग्णालय सिपीआर येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काव्याचा मृत्यू झाला. नेमकी ही विषबाधा कशामुळे झाली याचा शोध पोलिस घेत आहेत.