(देवरूख / सुरेश सप्रे)
मा. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निर्माण झालेल्या संदिग्धतेमुळे आज देवरूख येथे आरक्षण बचावच्या मागणीसाठी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी समाजवादी गणराज्य पार्टीचे सचिव विनय खेडेकर, तालुका कार्याध्यक्ष मोहीन साटविलकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र कदम, आरपीआयचे कृष्णा कदम, चंदन कदम, सेवानिवृत्त अधिकारी वाय. जी. पवार, बी. बी. पवार, संजय जाधव, वैभव कदम, संदेश सुवारे. सचिन जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या तहसिलदार यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात माननीय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने क्रिमिलेयर आणि उपवर्गीकरणाबाबत नुकताच एक निकाल दिला आहे. या निकालामुळे ST, SC आणि OBC आरक्षण धोक्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे.
शिकलेल्या पहिल्या पिढीला पुढे जाण्याचा रस्ताच बंद होणार आहे, अशी शंका उपस्थित होते आहे. यासंदर्भात सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी आपण आवश्यक सूचना संबंधितांना कराव्यात आणि राज्य सरकारने सुद्धा तातडीने भारत सरकारकडे रदबदली करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून आज हे निवेदन देऊन SC, ST आणि OBC समुदायाच्या भावना शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.