(पुणे)
पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळा येथील टायगर पॉईंटवर त्यांनी आत्महत्या केली आहे. एका झाडाला गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. अण्णा गुंजाळ असे या आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
तीन दिवसांपासून गुंजाळ गैरहजर होते. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. मात्र, आज गुंजाळ यांनी आत्महत्या केल्याची माहिती लोणावळा पोलीसांनी दिली. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोणावळ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक यांनी लोणावळा शहराजवळील टायगर पॉईंट परिसरातील एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. अण्णा गुंजाळ असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. मात्र, ३ दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. तसेच त्यांचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळे गुंजाळ नेमके गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. खडकी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात येणार होती. मात्र, आज त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आले. टायगर पॉइंटवर त्यांची क्रेटा कार सुद्धा आढळलेली आहे. या कारमध्ये एक डायरी सापडली आहे. या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचं कारण सापडू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनीच आत्महत्येचं पाऊल उचलल्यामुळे पोलीस दलात तसेच परिसरात खळबळ उडाली आहे.