(लांजा / प्रतिनिधी)
भगवान बुद्धांचा विजय असो… बुद्धगया आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची… बुद्धगया आमच्या तांब्यात द्या, अशा घोषणांनी सोमवारी लांजा शहर परिसर दणाणून निघाला होता. लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई-ग्रामीण व तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन ते लांजा तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रपती यांच्याकरिता निवेदन देण्यात आले. लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई-ग्रामीण व तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने राष्ट्रपती यांना निवेदन लांजा तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले. लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी निवेदन स्वीकारले.
मोर्चाची सुरुवात लांजा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथून दुपारी 12 वा. सुरुवात झाली तर लांजा तहसीलदार कार्यालय येथे झालेल्या सभेने मोर्चाची सांगता झाली. राष्ट्रपती यांना स्थानिक प्रशासनामार्फत दिलेल्या निवेदनात लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई- ग्रामीण व तालुक्यातील बौद्ध समाजाने म्हटले आहे की, बिहार राज्यातील महाबोधी महाविहार येथे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली, तो पिंपळवृक्ष आजही दोन हजार पाचशे वर्ष होऊन तिथे आहे. हे ठिकाण बौद्धांचा ताब्यात असावे, हिंदू ब्राह्मण पुरोहित यांच्यापासून ते मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी भन्ते आनंद शांती रक्खो यांनी उपस्थित बौद्ध जनसमुदायाला मार्गदर्शन केले. या मेळाव्यामध्ये लांजा तालुका बौद्धजन मंडळ ग्रामीणचे अध्यक्ष संतोष जाधव, कार्याध्यक्ष लहू कांबळे, सचिव सचिन जाधव, अनोज जाधव, भाई जाधव, अनिरुद्ध कांबळे, सिद्धार्थ देवधेकर, हनुमंत कदम, गणपत लांजेकर, दीपक पवार, प्रभाकर गवाणकर, धर्मदास बापेरकर, प्रभाकर कांबळे यासह मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले होते. लांजा तालुक्यातील महिलांचा सहभाग लक्षवेधी होता. शेवटी लांजा ताहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.