(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कास्ट्राईब संघटनेचा जिल्हा मेळावा रविवार दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप नजीकच्या माध्यमिक पतपेढी येथे कास्ट्राईब संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
सदरचा मेळावा हा शिक्षकांच्या एसमस्या आणि संघटनेचे महत्त्व या प्रमुख विषयावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मार्गदर्शक म्हणून संघटनेचे अभ्यासू आणि धडाडीचे राज्याध्यक्ष आकाश तांबे, राज्य संघटनेचे माजी कार्याध्यक्ष प्रशांत मोरे, राज्य सरचिटणीस रविंद्र पालवे, तसेच या मेळाव्यासाठी रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधिक्षक संघमित्रा फुले, रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीम. जयश्री गायकवाड, राज्य संघटनेचे माजी उपाध्यक्ष मिलिंद कदम, कास्ट्राईब संघटनेचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, कार्याध्यक्ष प्रदिप पवार, सरचिटणीस प्रशांत जाधव, पतपेढीचे माजी व्हा.चेअरमन विलास शिंदे, संचालक बिपीन मोहिते, हिरालाल चावरे यांसह शैक्षणिक, सामाजिक, विधायक चळवळीतील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक शिक्षिकांचा मान्यवरांच्या, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध प्रेरणादायी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील नैपुण्य संपादन केलेल्या विविध क्षेत्रातील तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शकांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
जिल्हा मिळावा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुक्यांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, सभासद अधिक मेहनत घेत आहेत. या मेळाव्यासाठी जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, सरचिटणीस प्रशांत जाधव यांनी केले आहे.