(देवरूख)
संंगमेश्वर तालुक्यातील देवरूख- मार्लेश्वर मार्गावरील निवेखुर्द येथील उतारातील अवघड वळणावर डांबरलोडची वाहतुक करणारा डंपर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी रेलिंगला तोडून दरीत पलटी झाल. हा अपघात काल गुरूवारी दुपारी ३.२० वा. घडला असून सुदैवाने या भीषण अपघतातून चालक बालंबाल बचावला आहे.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, जयदिप प्रभू (रा. साळवी स्टाँप, रत्नागिरी) यांनी या अपघाताबाबतची फिर्याद दिली आहे. सुरज हरिश्चंद्र पवार (वय-२५, रा. वांद्री. ता. संंगमेश्वर) हा आपल्या ताब्यातील (एम. एच. ०८ एच. २४४८) हा डंपर गुरूवारी वांद्री ते देवरूखमार्गे मार्लेश्वर असा घेऊन जात निवेखुर्द गावात रस्ता तीव्र उताराचा आणि वळणाचा माहित असूनही डंपर वेगात चालवत होता. डंपर निवेखुर्द येथील तीव्र उतारात आला असता वळणात चालकाचा डंपरवरील ताबा सुटला आणि डंपर रेलिंग तोडून थेट रस्त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या दरीत जाऊन पलटी झाला.
या अपघातात डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातून चालक आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. या अपघातप्रकरणी चालक सुरज पवार याच्याविरोधात पोलिसांकडून भादंवि २७९ व मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर करीत आहेत.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1