(रत्नागिरी)
शहरातील एका नामवंत शाळेत दहावीतील विद्यार्थीनीला प्रॅक्टिकल शिकवण्याच्या बहाण्याने अश्लील केल्याप्रकरणातील शिक्षकाला न्यायालयाने बुधवारी २५ हजार रुपयांचा जामीनावर मंजूर केला. वर्तन प्रथमेश नवेले (रा. नाचणे, रत्नागिरी) असे या संशयित शिक्षकाचे नाव आहे. त्याने शाळेत शेती व पशूपालन या विषयाचे प्रॅक्टिकल सुरु असताना दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले होते.
पीडितेच्या मैत्रिणीने ही हकीकत पीडितेच्या आईला कळवल्यानंतर १३ जानेवारी रोजी अनेक विद्यार्थिनींचे पालक शाळेत धडकले. त्यांनी हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितला. पीडितेने याबाबत शहर पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर पोक्सो कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आली.
त्याने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. बुधवारी न्यायालयाने त्याचा २५ हजारांचा जामीन मंजूर केला. त्याच्यावतीने ॲड आदेश चवंडे, ॲड विवेक दुबे, ॲड प्राजक्ता दुबे, ॲड प्रतिक मुळ्ये, ॲड. श्रद्धा कांबळे, ॲड. यशराज सावंत, ॲड. रिया आंबेरे आणि आर्यन सावंत यांनी काम पाहिले.