(रत्नागिरी)
शहरातील आरोग्य मंदिर येथे पाच दिवसांपूर्वी बेदकारपणे मिक्सर ट्रकने दूचाकीला मागून धडक दिली होती. या अपघाताप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चालकाविरोधक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 10 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरोग्य मंदिर येथील बस स्टॉप जवळ घडली होती.
याप्रकरणी उपेंद्र रामभजन सिंग (29, राहणार-झारखंड) असे ट्रक चालकाचे नाव आहे. 10 जून 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास शुभदा विजय सुर्वे (30 राहणार भंडारपुळे रत्नागिरी) आपल्या ताब्यातील दुचाकीवरून अश्विनी प्रथमेश बोरकर यांनी मागे बसवून (एम एच 08 AE 2748) साळवी स्टॉप ते मारुती मंदिर असा प्रवास करत होत्या. सुर्वे या आरोग्य मंदिर बस स्टॉप जवळ आले असता डाव्या बाजूला बस स्टॉप असल्याने एस टी बस देखील थांबलेली होती. त्यामुळे आपली दुचाकी त्यांनी उजव्या बाजूने वळवून पुढे जात असताना भरधाव वेगाने मिस्कर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दोघींनाही दुखापत होऊन त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या अपघाताप्रकरणी धडक देणाऱ्या मिक्सर ट्रक चालकाविरोधात भादवी कायदा कलम 219 , 367 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.