(खेड / भरत निकम)
तालुक्यातील खोपी धामनंद फाटा येथे रस्त्याचे बाजुला असलेल्या चायनीज दुकानात १,९१५ / – रुपये किमतीच्या देशी विदेशी ७ बियरच्या बाटल्या विक्री करत असताना आढळून आल्याप्रकरणी दोघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ जुलै रोजी १२ : २० वाजताच्या सुमारास घडली.
अनंत गंगाराम किंजळकर (वय – ५५ वर्षे ) व अमोल चंद्रकांत कदम ( वय – ४६ वर्षे )असे त्या गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. गैरकायदा बिगरपरवाना देशी विदेशी दारुच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने आपले ताबे कब्जात बाळगले स्थितीत मिळुनआले व चायनीज दुकानातून विक्री करताना आढळून आले म्हणून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.