(दापोली)
तालुक्यातील आंजर्ले खाडीलगत नांगरून ठेवण्यात आलेली गौरी नावाची नौका पावसाच्या जोराने वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही नौका प्रमोद दोरकुळकर यांच्या मालकीची आहे.
आंजर्ले खाडीलगत सुरक्षितरित्या नांगरून ठेवण्यात आली होती. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पुरदृश्य स्थिती आहे. प्रमोद दोरकुळकर यांच्या मालकीची गौरी नावाची मासेमारी नौका खाडीला पूर आल्याने अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाली व पाणी थेट नौकेत घुसले. खाडीच्या पाण्याने किनारा ओलांडल्याने नांगरून ठेवलेली नौका पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून समुद्रात गेली. त्यानंतर ही नौका आंजर्ले समुद्र किनारी वाहून आली.
किनाऱ्यावर नौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळजवळ 22 ते 25 लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. सुदैवाने पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने बोटीवर कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे.