(लांजा)
तालुक्यातील चाफेट नेमणवाडी येथील 29 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. ती घरातून निघताना लांजा येथे डॉ.पत्की यांच्या दवाखान्यात जाते असे सांगून गेली, मात्र घरात न परतल्याने तिच्या पतीने लांजा पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. सर्वत्र शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागत नसल्याने अखेर संजय नेमण यांनी बुधवार दि.२२ मे रोजी दुपारी दीड वाजता लांजा पोलीस ठाण्यात आपली पत्नी संध्या नेमण ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या संजय नेमण (29, रा.चाफेट, नेमणवाडी, ता.लांजा, जि.रत्नागिरी) ही मंगळवार 21 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरातून निघताना लांजा येथे डॉ.पत्की यांच्या दवाखान्यात चेकअपकरिता जाते असे सांगून घरातून निघून गेली. ती घरी परत न आल्याने संजय बापू नेमण (वय 31, रा.चाफेट नेमणवाडी, ता.लांजा, जि.रत्नागिरी) यांनी आजूबाजूतील परिसरात तिचा शोध घेतला. तसेच नातेवाईकांकडे फोन करून चौकशी केली, सर्वत्र शोध घेऊनही काहीच थांगपत्ता लागत नसल्याने अखेर संजय नेमण यांनी बुधवार 22 मे रोजी दुपारी दीड वाजता लांजा पोलीस स्थानकात आपली पत्नी संध्या नेमण ही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
संध्या संजय नेमण (वय 29) हिची उंची 5 फुट, रंग सावळा, केस काळे लहान, चेहरा उभा, बांधा सडपातळ, अंगात हिरवी साडी, पायात जोडवी, नाकात फुली, पायात चप्पल, हातात दोन कापडी पिशव्या व सोबत सॅमसंग कंपनीचा मोबाईल अशा प्रकारचे संध्या नेमण हिचे वर्णन असून सदर व्यक्ती कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पोलीस स्थानकात संपर्क साधावा असे आवाहन लांजा पोलीसांच्यावतीने करण्यात आले आहे.