(राजापूर/प्रतिनिधी)
सामाईक घरास राहण्यास न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे वृध्द आपल्या घरी राहण्यास आले असता त्यांना भावांनी अटकाव केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना राजापूर तालुक्यातील शिरसे बादेवाडी येथे 4 मे रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक सावळाराम मांजरेकर (72, शिरसे, राजापूर, सध्या सायन मुंबई) यांनी आपल्या गावातील घरात राहण्यासाठी कोर्टात केस दाखल केली होती. त्यानुसार कोर्टाने त्यांना 3 मे रोजी आपल्या सामाईक घरात राहण्याचे आदेश दिले. अशोक मांजरेकर हे बादेवाडी राजापूर येथे राहणेसाठी गेले असता त्यांचे भाऊ अनंत सावळराम मांजरेकर, रुपेश अनंत मांजरेकर, रुपेश यांची पत्नी (नाव माहीत नाही), ॠषिकेश अनंत मांजरेकर यांनी 3 मे रोजी सकाळी 7.30 ते 4 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सामाईक घरात येण्यास अटकाव केला.
अशोक मांजरेकर नाटे पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अनंत मांजरेकर, रुपेश मांजरेकर, रुपेशची पत्नी, ॠषिकेश मांजरेकर यांच्यावर भादविकलम 341,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार बागूल करत आहेत.