(रत्नागिरी/प्रतिनिधी)
तालुक्यातील वळके गायरावणे व पन्हळी येथे हापूस आंब्याच्या बागेतील 200 किलोचे 6 हजार 200 रुपये किंमतीचे हापूस आंबे काढून नेल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज पवार (44, पाली देवतळे, रत्नागिरी) यांची वळके गायरावणे व पन्हळी येथे आंब्याची बाग आहे. या बागेतून आंबे चोरीला जातात याची त्यांना शंका होती. त्यानुसार त्यांनी पाळत ठेवली. 3 मे रोजी दोघेजण अॅपे टेम्पोतून आंबे विक्रीसाठी घेवून जात असताना दिसले. पवार यांनी त्यांचा पाठलाग केला. पाली येथील आंबा खरेदी विक्री केंद्राजवळ ते दोघेही गेले असता पवार त्या ठिकाणी पोहोचले. पवार यांना पाहताच दोघेही आंबे तेथेच टाकून पळून गेले.
मनोज पवार यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रशांत गोरे (26), शशिकांत गोरे (3र्2ें दोन्ही रा. वळके, धनगरवाडी) यांच्यावर भादविकलम 379, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.