(चिपळूण/प्रतिनिधी)
आयसीआयसीआय बँक बोरीवली मुंबई येथून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने वृध्दाला 1 लाख 60 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे घडली. ही घटना 2 मे रोजी सायं. 4 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमशुद्दीन इसहाक परकार (58, गोवळकोट, चिपळूण) यांच्या मोबाईलवर राधिका शर्मा नावाच्या अनोळखी महिलेचा 8819905217 या नंबरवरुन फोन आला. आयसीआयसीआय बँक मुंबईतून बोलतेय असे सांगून के्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी कॉल केला आहे असे शमशुद्दीन यांना सांगितले. त्यानुसार परकार यांचा डेबीट कार्ड नंंबर व ओटीपी नंबर मागवून घेतला. याचवेळी ओटीपीच्या सहाय्याने 95 हजार व 65 हजार अशी एकूण 1 लाख 60 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शमशुद्दीन परकार यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलेवर भादविकलम 419, 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.