( डिजि टेक )
गुगलच्या प्ले स्टोरवर येण्याआधी सिक्योरिटी चेक करावा लागतो. परंतु, यानंतरही अनेक अॅप्स प्ले स्टोरवर या ठिकाणी पोहोचतात. त्यानंतर या अॅप्स च्या धोकादायक पद्धतीमुळे युजर्संना नुकसान पोहोचले जाते. गुगलला अशा अॅपविषयी माहिती होताच गुगल प्ले स्टोरवरून हटवले जाते. आता गुगलने आणखी सहा अॅप्सला हटवले आहेत.
काही अॅप्स युजर्सचा पर्सनल डेटा चोरी करत असल्याचे अनेक प्रकरण समोर येत असतात. आता अशाच काही अॅप्सना गुगलने मोठा झटका दिला आहे. गुगलने प्ले-स्टोअरवरून अशाच काही 6 अॅपना काढून टाकले आहे. हे अॅप्स युजर्सच्या फोनमध्ये व्हायरस पसरवत होते. तसेच सर्व अॅप्समध्ये शार्कबॉट बँक स्टीलर मालवेअर देखील होते जे युजर्सची बँक आणि अकाऊंट संबंधित माहिती चोरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता तुमच्या फोनमध्ये यापैकी कोणतेही अॅप असल्यास ते लगेच डिलीट करा.
गूगलने काढून टाकलेल्या अॅप्सची नावे :
अॅटम क्लीन-बूस्टर अँटीव्हायरस (Atom Clean-booster Antivirus)
अँटीव्हायरस सुपर क्लीनर (Antivirus Super Cleaner)
अल्फा अँटीव्हायरस क्लीनर (Alpha Antivirus Cleaner)
पावरफुल अँटीव्हायरस क्लीनर (Powerful Cleaner Antivirus)
सेंटर सिक्युरिटी अँटीव्हायरस (Center Security Antivirus)
सेंटर सिक्युरिटी अँटीव्हायरस (Center Security Antivirus)
दरम्यान जर तुम्ही यापैकी कोणतेही अॅप तुम्ही वापरत असाल, तर तुम्ही ते ताबडतोब डिलीट करा. नाहीतर तुमची ऑनलाईन बँकिंग फसवणूक होण्याची शक्यता असते, तसेच या अॅप मधून आपला डेटा चोरी ही होऊ शकतो तर अनेक वेळा अशा अॅपमुळे तुमचं बँक अकाउंट पूर्णतः मोकळं होऊ शकत.