(इक्बाल जमादार/खेड )
दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार श्री.संजयराव कदम, तालुकाप्रमुख व दापोली नगरपंचायत नगरसेवक श्री.रूषीकेश गुजर यांच्या मध्यस्थीने तसेच बैठकीच्या आश्वासनामुळे भारती शिपयार्डच्या कर्मचाऱ्यांचे थकित वेतनाबाबतचे उपोषण स्थगित करण्यात आले.
यावेळी दापोली तहसीलदार सौ.वैशाली पाटील, दापोली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष श्री.मुजीब रूमाणे, जिल्हा परीषद सदस्य व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री.मोहन मुळे, शहराध्यक्ष श्री.नितिन मयेकर, दापोली नगरपंचायत नगरसेवक व बांधकाम सभापती श्री.विलास शिगवण, दापोली नगरपंचायत नगरसेविका व महीला बाल कल्याण समिती सभापती सौ.साधना बोत्रे,श्री.शाम दाभोळकर,भारतीय कामावर सेनेचे अध्यक्ष, कामगार सेनेचे उपाध्यक्ष व उसगाव ग्रामपंचायत सरपंच श्री.चेतन रामाणे,श्री.कुंदन तोडणकर,श्री.उमेश शिंदे, श्री.योगेश महाडीक, श्री.उमेश साठले, श्री.अनिरूध कदम, श्री.विराज जोशी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कामगार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दापोली तालुक्यातील दाभोळजवळील उसगाव येथील अवसायानात गेलेल्या भारती शिपयार्ड कंपनीमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांनी त्यांचे थकित वेतन मिळावे, या मागणीसाठी १ मे रोजी दापोली येथील तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार श्री.संजयराव कदम यांच्या मध्यस्थीने तसेच त्यांना मिळालेल्या आश्वासनानंतर काल २ मे रोजी दुपारी स्थगित केले.
उसगाव येथे जहाजबांधणी व दुरुस्त करणारी नावाजलेली जगप्रसिद्ध भारती शिपयार्ड सुरू होती. सध्या तेथे सुरक्षा आणि मेंटेनन्स करणारे कर्मचारी यांचीच उपस्थिती असते. सध्या ही कंपनी लिक्विडेशनमध्ये काढण्यात आली असून ती डीलाईट या कंपनीच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळेच त्याचा संपूर्ण ताबा व सर्व अधिकार लिक्विडेटर विजयकुमार अय्यर यांच्याकडे देण्यात आले आहेत.
या कंपनीमधील कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट २०१५ ते मे २०१७ या कालावधीतील थकित पगार, देणी ही रक्कम जवळपास ७ कोटी इतकी आहे. ही रक्कम मिळावी, या मागणीसाठी कामगार आणि कामगार संघटनेने त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करूनही संबंधितांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्याविरोधात उपोषण सुरू केले होते.