(संगमेश्वर)
संगमेश्वरी भजन मंडळ संगमेश्वर तालुका आयोजित उद्योजक लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्था व उद्योजक सुरेश कदम पुरस्कृत भजन संध्या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात संगमेश्वर कसबा येथील प्रकाश घाणेकर यांना नुकताच संगमेश्वरी भजनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण माळवाशी (किरदाडी) लक्ष्मी वात्सल्य फार्म हाउस येथे पार पडले.
या कार्यक्रमात बोलताना राजेंद्र महाडिक म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राला लाभलेला संतांचा वारसा जपत भजनाच्या रुपाने जनजागृती व प्रबोधन करणार्या ज्येष्ठ भजनी बुवा प्रकाश घाणेकर यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार शिवसेना रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी काढले. ते संगमेश्वरी भजन मंडळ व भजनप्रेमी प्रसिध्द उद्योजक सुरेश कदम आयोजित भजनसंध्या कार्यक्रमात ते बोलत होते.
तालुक्यातील भजन कलेला हक्काचे व्यासपीठ मिळण्याच्यादृष्टीने उद्योगपती सुरेश कदम यांनी भजनसंध्या स्पर्धेसाठी पुढाकार घेतला होता. ही स्पर्धा 16 डिसेंबरपासून प्रत्येक गुरुवारी सुरु झाली होती. या कार्यक्रमात 40 गावातील 38 भजने सादर करण्यात आली. यामध्ये फणसवणे येथील भजनीबुवा प्रकाश घाणेकर यांना संगमेश्वरी भजनरत्न पुरस्कार जाहीर झाला.
कार्यक्रमात बोलताना उद्योगपती सुरेश कदम म्हणाले, फणसवणेतील प्रकाश घाणेकर व त्यांचे कुटुंबियांमध्ये भजनाची 150 वर्षांची परंपरा असून त्यांनी भजनी कलेचा वारसा अविरतपणे चालू ठेवून आपल्या कुटुंबाबरोबरच तालुक्याचे नाव उज्ज्वल केले. त्यामुळे योग्य व्यक्तीचा सन्मान झाल्याचे भावोद्गार सुरेश कदम यांनी काढले.
प्रकाश घाणेकर हे एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी असून शिवसेना उपतालुकाप्रमुख पदाची जबाबदारी पार पाडत असून प्रत्येक निवडणुकीत पक्षीय नेतृत्व निवडून आणण्यात त्यांचा पुढाकार असतो. आपल्या गावातील फणसवणे नं. 1, फणसवणे गुरववाडी शाळांच्या प्रगतीत त्यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्यानेच फणसवणे नं. 1 चे विद्यार्थी राज्यस्तरीय खो-खो खेळाडू तयार झाले. सत्कारावेळी बोलताना, जीवनातील हृदय सत्कारात आपले पूर्वजांची पुण्याई, आई वडिलांचे आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाची साथ व महाडिक परिवाराचे सहकार्य बहुमोल आहे. अनेक भजनी कलाकार तयार करुन भजन कलेचा प्रसार व प्रचार करण्याची जबाबदारी या पुरस्काराने वाढली असून प्रामाणिकपणे परमेश्वराने हे फळ दिल्याचे ते मोठया मनाने मान्य करतात.
कार्यक्रमाला प्रसिध्द उद्योजक सुरेश कदम, शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, घाणेकर कुटुंबिय, तालुक्यातील संघटनेचे अध्यक्ष महेेंद्र नांदळजकर, गुरववाडी सरपंच विठ्ठल गुरव, भजनप्रेमी कलावंत, ग्रामस्थ महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. घाणेकर यांचे कसबा, फणसवणे दशक्रोशीतून कौतुक होत आहे.