(मुंबई)
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. आज भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन करण्यात आलं, यावेळी ते बोलत होते.
‘वातानुकूलित रेल्वेच्या तिकीट दरात किती कपात करायला हवी, असं आम्ही वेगवेगळ्या स्तरातील लोकांना विचारत होतो. त्यावर कोणी म्हणत होतं ३० टक्क्यांनी दर कमी करा, कोणी म्हणत होतं २० टक्क्यांनी दर कमी करा. मात्र देशाचे पंतप्रधान हे नेहमी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत असतात. त्यामुळे आम्हीही सामान्य माणसासाठी निर्णय घेत वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांची कपात करत आहोत,’ असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.