(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथे सार्वजनिक श्री सत्यनारायणाच्या पूजेचे औचित्य साधत शुक्रवार 13 मे रोजी तेलेवाडी मित्र मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय पारंपरिक ताशे वादनाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कळंबस्ते तेलेवाडी मित्र मंडळाने केले आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त तीन ते चार ताशे, दोन ते तीन छोटे ढोल(जे ताशे वाजपात वापरतात ते ), एक टिमकी, दोन वाजंत्री, असा साज असेल. तसेच ढोल (जे ताशे वाजपात वापरतात ते ), ताशे, हे ज्या संघांचे चामडीचे असतील त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धेसाठी ड्रेस कोडची अट नसुन एखाद्या संघाचा ड्रेस कोड असल्यास त्याची विशेष नोंद घेण्यात येईल. स्पर्धेकांनी आपला स्वतःचा संच आणावयाचा असुन प्रवेश फी रुपये 300/-(तीनशे ) असणार आहे. यासाठी प्रथम पारितोषिक रु,5555/-आणि आकर्षक शिल्ड, दुसरे पारितोषिक रु,3333/-आणि आकर्षक शिल्ड, तिसरे पारितोषिक रु,2222/ -आणि आकर्षक शिल्ड अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच कामगिरी बघून इतर काही पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पर्धेकाला 20 मिनिटे वेळ असेल. त्या वेळेत जास्तीत जास्त चाली मारण्याची कला स्पर्धकांना दाखवावी लागेल. स्पर्धेकांनी आपली नाव नोंदणी दोन ते तीन दिवस आधी करणे बंधनकारक आहे. अंतिम निर्णय हा पंचांचा राहील. स्पर्धेवेळी, स्पर्धेकांना पंधरा मिनिटे आधी उपस्थित असल्याची नोंदणी करावी लागेल असे कळविण्यात आले आहे.
यासाठी स्पर्धेचे ठिकाण जि,. प. प्राथमिक मराठी शाळा क्र,1 कळंबस्ते तेले वाडी, फणसवणे उमरे रोड, ता, संगमेश्वर जि, रत्नागिरी असून वेळ सां.7 वा आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी उमेश नेवरेकर (8308506031), विनोद नेवरेकर (8975626934), संकेत विभुते (8698127300), वैभव विभुते (7448081898) यांचेशी संपर्क करावा. तरी जास्तीतजास्त स्पर्धेकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन तेलेवाडी मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.