(संगमेश्वर/प्रतिनिधी)
आंबेड खुर्द संगमेश्वर येथे बांधकामाधिन असलेल्या कुणबी भवनासाठी समाज बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ आंबेड खुर्द संगमेश्वर अंतर्गत नावडी विभागाच्यावतीने उद्या शनिवार 30 एपिल रोजी सकाळी 10 वा. कुरधुंडा गणपती मंदिर येथे या भव्य कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शिक्षण क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात व कोरोना काळात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या महनीय व्यक्तींचा सत्कार
संगमेश्वर गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, संगमेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, शिक्षणरत्न पुरस्कार पाप्त रमेश घडशी, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त विलास कानर, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड प्राप्त अक्षय पडवळ, आदर्श शिक्षक पुरस्कारपाप्त नथुराम पाचकले, वकील प्राची कानसरे, उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार अशा महनीय व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहदेव बेटकर (माजी शिक्षण सभापती जि.प.), संतोष थेराडे (माजी उपाध्यक्ष, जि. प. रत्नागिरी), शंकर भुवड (जि.प. सदस्य), पर्शुराम वेल्ये (उपसभापती, पंचायत समिती संगमेश्वर), सुरेश कांगणे (अध्यक्ष, संगमेश्वर तालुका कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ), कृष्णाजी हरेकर (माजी पंचायत समिती सभापती संगमेश्वर), अनिल बोल्ये (उपाध्यक्ष कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ, आंबेड), गुणाजी घडशी (खजिनदार, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ, आंबेड), सुनील गेल्ये (हिशेब तपासणीस, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ, आंबेड), बाळकृष्ण काष्टये (सल्लागार, कु. शि. प. मं., शा. आंबेड), तानाजी दोरखडे (सदस्य, कु. शि. प. मं., शा. आंबेड), ज्योत्स्ना होडे (सदस्य, कु. शि. प. मं., शा. आंबेड), सुरेश भायजे (अध्यक्ष, ब. वि. आ.), माधवीताई गीते (सदस्या, जि. प. रत्नागिरी), शंकर शिगवण (मुंबई शिक्षण पसारक मंडळ अध्यक्ष), दत्ताराम लांबे (अध्यक्ष, कु. शिक्ष. प. मं. शाखा आंबेड), दिलीप पेंढारी (माजी पंचायत समिती सभापती, संगमेश्वर), दिपीकाताई जोशी (माजी जि. प. सदस्या), शंकर बोल्ये (सचिव, कु. शि. प. मं. ता. संगमेश्वर), सुहास गेल्ये (सहसचिव, कु. शि. प. मं., शा. संगमेश्वर), कृष्णकांत डावल (संपर्कपमुख, कु. शि. प. मं., शा. संगमेश्वर), विजय कुवळेकर (सदस्य, कु. शि. प. मं., शा. संगमेश्वर), संतोष चांदे (सदस्य, कु. शि. प. मं., शा. संगमेश्वर), मनोहर किंजळकर (सदस्य, कु. शि. प. मं., शा. संगमेश्वर), मयुरी डावल (सदस्य, ग्रामपंचायत कुरधुंडा), अनंत मांडवकर (नावडी विभाग), यशवंत चांदे (कसबा विभाग), रमेश डिके (तुरळ विभाग), दीपक जाधव (माखजन विभाग), आदी गावातील गावकर, पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यकमाचे आयोजन कुरधुंडा कुणबी बांधव व महिला मंडळ यांनी केले आहे.