(चिपळूण/प्रतिनिधी )
कोळकेवाडी येथील धरणाजवळ पोहण्यासाठी गेलेले दोघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. सुजय गावठेे, ऐश्वर्या खांडेकर यांच्यासोबत शाहीन कुटटीनो, रुद्र जंगम कोळकेवाडी टप्पा चार नजीक कालव्यात पोहण्यासाठी गेले होते.
यावेळी पाण्याच्या लोंढयाने हे चौघेजण वाहू लागले. आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी शाहीन कुट्टीनो व रुद्र जंगम यांना वाचवले. मात्र सुजय गावठे व ऐश्वर्या खांडेकर पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाले होते. गुरुवारी सकाळी 9.30 वा. च्या सुमारास ऐश्वर्या हिचा मृतदेह सापडला. मात्र सुजय याचा अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही.