मुंबई : सध्या राजकारणात अनेक धक्कादायक किस्से ऐकायला मिळत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप व भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच अन्य काही विशेष गोष्टीही आता बाहेर येऊ लागल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी खोट्या तक्रारी दाखल करून राजकारणी लोकांची बदनामी करण्याची मोहीम काही लोकांनी हाती घेतली आहे. यातच आता शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात साकीनाका पोलीस स्थानकात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल शेवाळे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. शेवाळे यांनी म्हटले आहे की, माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहे. माझी प्रतिमा खराब करण्याचा हा डाव आहे.
मी निर्दोष आहे आणि यासाठी मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. त्याचप्रमाणे माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बोगस तक्रारीमागील लोकांचा मी नक्कीच पदार्फाश करेन. माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पुर्णत: विश्वास असून याबाबत पोलीस आणि न्याययंत्रणा योग्य निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे असे त्यांनी म्हटले आहे.
‘मी निर्दोष असल्याचं सिध्द करण्यासाठी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. तसेच या तक्रारीमागे असणाऱ्या लोकांचाही पदार्फाश लवकरच करेन”, असंही शेवाळे यांनी स्पष्ट केलं.