( नवी दिल्ली )
जम्मू काश्मीरमध्ये १ जानेवारी २०२२ पासून २७ एप्रिल २०२२ पर्यंत ६२ दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये सर्वाधिक दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे आहेत. ही माहिती काश्मीरच्या आयजीपींनी दिली.
कलम ३७० रद्द झाल्यानंतर सुरक्षा पथकांना केंद्र सरकारने दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी पुरेसे अधिकार आणि स्वातंत्र्य दिले. याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. दहशतवादी मारणे, दहशतवादी पकडणे अशा स्वरुपात सुरक्षा पथके सक्रीय झाल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधीत आहे. राज्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था असल्यामुळे मागील काही महिन्यांपासून जम्मू काश्मीरमधील पर्यटनात वाढ होऊ लागली आहे. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आनंदाचे वातावरण आहे.