(रत्नागिरी)
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या आभार संस्था संचलित जिल्हा प्रासादिक भजन मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरीत प्रथमच रंगणार हिन्दु- मुस्लिम भजनाचा डबलबारी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील परंपरा आणि लोककलावंताना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शनिवार दिनांक ७ मे २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारा तसेच मंत्री उदय सामंत पुरस्कृत भजनाचा डबल बारीचा सामना स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे अनुभवता येणार आहे.
हा सामना श्री गोसावी भजन मंडळ (केळशी आतगांव भातवाडी,दापोली) चे गुरुवर्य गजानन बेलोसे यांचे शिष्य बुवा श्री जहांगीर शेख पखवाजवादक श्री संतोष मांडवकर व श्री राजेंद्र जाधव विरूध्द श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ डिकसळ कर्जत रायगड भजनभूषण कैे गजानन पाटील बुवा यांचे सुपुत्र भजनसम्राट बुवा श्री प्रसाद पाटील (कर्जत रायगड) मृदुंगमणी श्री रणजित पाटील, तबला श्री आकाश काटे यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.
या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिध्द निवेदक श्री. योगेश खडपे हे करणार आहेत. तरी या कार्यक्रमाची आपण सर्वानी प्रवेशिका रु १००/ प्रमाणे स्वीकारण्यात येणार आहे. सर्वानी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री साईनाथजी नागवेकर (सचिव), वासुदेव वाघे व आभार संस्था अध्यक्ष श्री विनोद हळदवणेकर, उपाध्यक्ष कोकणरत्न बुवा संतोषजी शिरसेकर यांनी केले आहे.