गुहागर तालुक्यातील भातगाववासीयांचे ग्रामदैवत श्री जुगाई देवी मंदिराचे जीर्णोद्धार सोहळा दिनांक- २१ ते २७ एप्रिल २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. धार्मिक विधी सहित विविध कार्यक्रम या निमित्ताने होणार आहेत.दिनांक २१एप्रिल २०२२ रोजी भातगाव मध्ये गावदेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
भातगावच्या इतिहासातील सुवर्ण क्षण न भूतो न भविष्यती ! म्हटल तरी वावग ठरणार नाही. देवीच्या मिरवणुकीची सुरुवात भातगाव पुलापासून सुरू झाली. गावातील प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांनी वेगवगळी वेशभूषा तसेच महिलांनी एकसमान परिधान केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेणारं होते.
फुलांची, गुलालाची उधळण ढोल-ताशांचा गजर, बेंजो, डीजे यांनी संपूर्ण वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. प्रत्येकजण आई जुगाई च्या जयघोषात तल्लीन झाला होता. मिरवणुकीच्या शेवटी देवीच्या मंदिरा जवळ येऊन देवीची आसने सानेवर ठेवून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. लक्षवेधी ठरलेली ही मिरवणूक भातगाव वाशीयांना अगदि स्मरणीय असणार आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !