(खेड/इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील खारी पट्टा विभागातील कोरेगाव संगलट रस्ता वाहनचालकांसाठी एक आव्हानच ठरत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे. या रस्त्यावर एखादा बळी घेतल्याशिवाय प्रशासनाचे डोळे उघडणार नाहीत काय असा संतप्त सवाल पंचक्रोशीतील नागरिक विचारत आहेत.
कोरेगाव संगलट मार्गावरील रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असुन अनेक वेळा मागणी करुनही या रस्त्याचे काम झालेले नाही. या रस्त्यावर सध्या पडलेले भले मोठे खड्डे पाहिले की धडकी भरते. या खड्डयात दुचाकीस्वार पडला तर त्याच्या जीवावर बेतू शकते. असे असूनही संबंधित खाते या रस्त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. येत्या १५ दिवसांत या रस्त्याचे काम हाती न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे
रस्त्याला झाडीने वेढले
कोरेगाव संगलट त्यावरील दोन्ही बाजूला मोठमोठी झाडी वाढली असल्याने गेल्या दोन वर्षापासून या रस्त्यावरील झाडी तोडण्यात आलेली नाही त्यामुळे लहान-मोठे अपघात सतत होत आहेत समोरून गाडी दिसून येत नाही त्यामुळे सतत अपघात होत आहेत संबंधित बांधकाम खाते या बाबीकडे सतत मुंग् गिलण्याची भूमिका घेतली आहे याबाबत संबंधित खात्याने त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे