(रत्नागिरी/प्रतिनिधी)
गॅरेजच्या स्पेअर पार्टचे सामान आणण्यासाठी 16 रुपयांची ऑनलाईन रक्कम भरुनही सामान न मिळाल्याने फसवणूक झाल्याची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली. ही घटना 22 एप्रिल रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सफवान हिदायत नाखवा (28, पावस पानगलेवाडी) यांचे एमआयडीसी मिरजोळे येथे गॅरेज आहे. गॅरेजच्या सामानाची आवश्यकता असल्याने त्यानी जस्ट डायलद्वारे जय लक्ष्मी ट्रान्सपोर्ट रांजणगाव, पुणे येथे 9506734123 या नंबरवर संपर्क साधून स्पेअर पार्ट मागवले. समोर सांगण्यात आले की, ट्रक चालक राम पटेल त्यांच्याकडून आपल्याला रत्नागिरीत सामान पोहोचेल. त्यांच्या व्हॉटसअॅप व्हॉटसअॅप नंबरवर सामानाची यादी पाठवा. तसेच 8052532627 या नंबरवर गुगल पे द्वारे 16 हजारांची रक्कम भरा असे सांगितले. नाखवा यांनी 16 हजार रुपयांची रक्कम भरलीही. दुसर्या दिवशी 23 एप्रिल रोजी नाखवा यांनी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास सामानाच्या चौकशीसाठी फोन केला, मात्र 5 ते 6 वेळा फोन करुनही कॉल उचचला गेला नाही. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे नाखवा यांच्या लक्षात आले. त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादविकलम 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.