इक्बाल जमादार /खेड
दापोली तालुक्यातील दाभोळ येथे रुद्र विनायक पदुकले वय वर्षे १२ याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील दाभोळ टेमकरवाडी वरचा विभाग येथे राहणारा रुद्र विनायक पदुकले (१२) याने काल शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. च्य सुमारास आपल्या राहत्या घरी भालाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर बालक ज्ञानदीप विद्यामंदिर दापोली येथील इयत्ता पाचवी मध्ये शिकत असल्याची माहिती प्राप्त होत आहे. काल सायंकाळी सातच्या सुमारास लक्ष्मी विठ्ठल पदुकले (रुद्रची आजी) हिला आपला नातू भालाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून लटकलेल्या स्थितीत आढळून आला.
या बालकाला उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे पुढील तपासणी करीता दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा संपूर्ण तपास दाभोळ पोलीस करित आहे. बालकाने गळफास का लावुन घेतला याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.