(रत्नागिरी)
रत्नागिरी शहर व तालुक्यामधील रिक्षा व्यवसायिकांना तसेच खाजगी सीएनजी वाहनधारकांना सीएनजीचा अनियमित पुरवठा होत आहे. सीएनजी भरण्यासाठी लागणारा प्रचंड वेळ तसेच कमी प्रेशरने मिळणारा सीएनजी त्यामुळे बिघडणारे गाड्यांचे अँव्हरेज, रत्नागिरीत सीएनजीची असणारी अत्युच्च किंमत या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी तर्फे आज जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या सर्व बाबींची सखोल चर्चा करून शिष्टमंडळाबरोबर लवकरच या संदर्भात बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बशीरभाई मुर्तुझा, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष निलेश भोसले, सनिफ गव्हाणकर, संतोष सावंत, संकेत कदम, मुज्जु काझी व रिक्षा व्यवसायिक उपस्थीत होते.