(मुंबई)
राज्यात भोंग्यावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू असताना राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राजकीय वातातावरण गरम असताना या झालेल्या बदल्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सतत चर्चेत असणारे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी जयंत नाईकनवरे यांची नाशिकच्या पोलीस आयुक्त पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची आयुक्तपदी वर्णी लागली आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात बदल्या आणि पदोन्नती देण्यात आलेल्या आहेत. मुंबईचे महत्वाचे पद म्हणून ओळखले जाणारे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त या पदावरून मिलिंद भारंबे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सुहास वारके यांच्याकडे मुंबई गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. अचानक एवढ्या बदल्या करण्याचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.
परमजित दहीया, निवा जैन, राजेंद्र माने, विनायक देशमुख, महेश पाटील, संजय गांधी जाधव, दीपक साकोरे, पंजाबराव उगले, श्रीकांत पाठक, दत्तात्रय शिंदे यांना पोलीस उपायुक्त ते अप्पर पोलीस आयुक्त अशी पदोन्नती देण्यात आली आहे. तर लखमी गौतम, संदीप कर्णिक, सत्यनारायण, प्रवीण पडवळ, एस.जयकुमार, निशीत मिश्रा, सुनील फुलारी, दत्तात्रय कराळे, संजय मोहिते, सुनील कोल्हे, प्रवीण पवार, बी.जी. शेखर, संजय बाविस्कर, जयंत नाईकनवरे यांना अप्पर पोलीस आयुक्त ते विशेष पोलीस महानिरीक्षक असे पोस्टींग देण्यात आले आहे. तसेच दीपक पांडे, सुहास वारके, मिलिंद भारंबे, सुरेश मेकला, रवींद्र शिसवे, कृष्णप्रकाश, अंकुश शिंदे आणि वीरेंद्र मिश्रा हे बदली करण्यात आलेले आयपीएस अधिकारी आहेत