(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील मा फेपडेवाडी येथे रामनवमी निमित्त श्रीराम जन्मसोहळा, पालखी प्रदक्षिणा, देणगीदार सत्कार, महिलांचा सत्कार, हळदी कुंकू समारंभ तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार असे विविध कार्यक्रम यावेळी पार पडले. या कार्यक्रमावेळी महिलांचा हळदीकुंकू समारंभ पार पडला. यावेळी समाजप्रबोधन कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य़ा, ओबिसी रत्नागिरी जिल्हा महिला संघटक आणि ब.वि.आ. पतसंस्था निवळीचे सचिव साक्षी रावणंग यानी महिलांना प्रबोधित केले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, महिलानी आपला पुर्व इतिहास जाणून घेतला पाहिजे. पुर्वीचा समाज हा स्त्रीसत्ताक होता. हे पटवून देताना त्यांनी आपल्या ग्रामदेवतेच्या उत्सवातील मुर्तिंची असलेली नावे ही जास्त करुन स्रित्वाची होती. त्यामुळे या प्रति असणार्या महामानवांचे विचार प्रत्येक स्रि ने आत्मसात करुन कृतिचा अंमल करावा असे आपल्या भाषणात आवर्जून सांगितले.
दरम्यान मृत वडिलांच्या देहाला स्मशानात जावून अग्नि देणार्या क्रांतिकारक महिला साै. अनिता सुनिल बडद (रा.उजगाव) हिचा सत्कार साक्षी रावणंग यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच स्मशानभूमी काँक्रीटीकरण देणगीदारांचा सन्मान करण्यात आला.
रात्री ९ वाजता १०वी, १२वी आणि इतर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय यश संपादित करणार्या सर्व विद्यार्थ्यांचा ट्रस्टच्यावतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर मानसकोंड ट्रस्टिच्या सर्व पदाधिकारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये कोकणचे व संगमेश्वर तालुक्याचे नाव उज्वल करणारा कोळंबेचा धावपटू अक्षय पडवळ व आर्टस गॅलरीतील आपली कलाकारी दाखविणारा अश्विन खापरे यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
रात्रो १०.०० वाजता फेपडे वाडी नवतरुणविकास मंडळ मुंबई निर्मित शाहिर नितिन रसाळ दिग्दर्शित तुच माझा पाठिराखा हा सामाजिक नाटकाचा प्रयोग सर्व कलाकारांनी उत्कृष्टपणे सादर केला. मुंबई मंडळाचे विशेष आभार मानण्यात आले. २०१९ मध्ये नाटकाची पुर्ण तयारी असतानाही कोरोनाच्या महामारीमुळे हा प्रयोग थांबला होता. अखेर हा प्रयोग गावी न्यायचाच असा जणू चंग बांधल्याने तरुणांनी हा प्रयोग राम नवमी निमित्त दिग्दर्शक शाहिर नितिन रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा केला.
कार्यक्रम यशस्विपणे पार पाडण्यासाठी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी, श्रीराम हनुमान ग्रामस्थ मंडळातील कार्यकर्ता आणि महिला मंडळ यांनी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था ठेवली त्यामुळे भाविकांना भोजनाचा आस्वाद घेता आला. त्या शिवाय बाळगोपाळ यांनी अपार मेहनत घेतली. या सर्वाच्या मेहनतीमुळे असा एका दिवसाचा भरगच्च कार्यक्रम यशस्विपणे पार पडला.
कार्यक्रमाला सुमंत गणपत फेपडे (अध्यक्ष), गणूजी हिरु फेपडे ( सचिव), नारायण झिमा फेपडे (खजिनदार), वसंत रामचंद्र खापरे (सदस्य), लक्ष्मण तुळाजी पाचकले (सदस्य), शिवराम हिरु मांयगडे (सदस्य), सुहास विठ्ठल खापरे (सदस्य), संजय लक्ष्मण फेपडे (सदस्य), तसेच फेपडे वाडी नवतरुण विकास मंडळ मुंबईचे श्री विश्वनाथ भिकाजी फेपडे, श्री तुकाराम सोमा फेपडे, श्री रामचंद्र बाबू फेपडे, श्री प्रकाश लक्ष्मण खापरे, श्री संतोष धोंडू फेपडे आणि स्वंयसेवक श्री दिपक फेपडे, श्री सुनिल शिगवण, श्री हरिश्चंद्र फेपडे, श्री नागेश फेपडे, श्री अभिषेक फेपडे, श्री दिनेश पाचकले, श्री दिलिप पाचकले, श्री गणेश फेपडे, श्री रुपेश फेपडे, श्री दशरथ फेपडे, श्री अनंत गार्डी, श्री दत्ताराम मांजरेकर, श्री प्रकाश खापरे, श्री रमेश खापरे, श्री सुनिल खापरे, श्री शंकर खापरे, श्री सुहास मांयगडे, श्री अशोक भोसले, श्री विजय भोसले, श्री चंद्रकांत फेपडे, श्री पर्शुराम फेपडे, श्री अशोक फेपडे, श्री संतोष पाचकले, कु. आशिर्वाद फेपडे, कु.तनेश फेपडे आदि उपस्थित उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री नथुराम पाचकले यांनी केले.