घरच्या घरी तयार करा ‘फेस मिस्ट’, 2 मिनिटांत मिळेल चमकदार त्वचा!
घरगुती फेस मिस्ट तयार करण्यासाठी काकडी, पाणी आणि लिंबू घ्या. या तीन गोष्टी एकत्रित वापरल्याने तुमची त्वचा हायड्रेटेड दिसेल. यासाठी प्रथम आपल्याला काकडीचा रस तयार करावा लागेल आणि त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला. ही पेस्ट चांगली मिक्स करा, त्यामध्ये पाणी घाला. यानंतर फेस मिस्ट एका स्प्रेच्या बाॅटलमध्ये काढा आणि काही वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा. ज्यावेळी आपण घराच्या बाहेर पडणार त्यावेळी फेस मिस्ट हे सोबत ठेवा.
गुलाब पाणी घरी करण्यासाठी सर्वात अगोदर एका पॅनमध्ये गुलाबाची पाने घाला आणि उकळण्यासाठी सोडा. मिश्रण थंड झाल्यावर स्प्रे बाॅटलमध्ये ठेवा आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. गुलाबाच्या पाण्यात बरेच अँटीऑक्सिडेंट असतात जे त्वचेचे पीएच संतुलित करण्यास मदत करतात.
कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेचे रक्षण करतात. यासाठी, आपल्याला कोरफडीचा गर आणि लिंबू लागणार आहे. कोरफडीचा गर आणि लिंबूचे चार ते पाच थेंब मिक्स करा. यामध्ये पाणी घाला फेस मिस्ट फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
ग्रीन टी आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. ग्रीन टीची बॅग, गरम पाणी आणि व्हिटॅमिन ईचा कॅप्सूल घ्या. या तिन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आणि हे थंड होऊ द्या. नंतर हे मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये ठेवा आणि ते फ्रिजमध्ये ठेवा.