*कोरोना लस किती सुरक्षित आहे *
उत्तर: कोरोना लस इतर आजारांवरील लसींप्रमाणेच सुरक्षित आहे.
*महिला मासिक पाळीमध्ये लस घेऊ शकतात का *
उत्तर: होय.
*गरोदर महिलांनी लस घ्यावी का *
उत्तर: गरोदर महिलांनी लस घेऊ नये.
*बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांनी लस घ्यावी का *
उत्तर: या संदर्भात काही सूचना जारी करण्यात आलेल्या नाही. मात्र आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
*मधुमेह , उच्च रक्तदाब, थायरॉईड कमी किंवा जास्त होण्याच्या आजार असल्यास लस घेणे सुरक्षित आहे का *
उत्तर: होय.
*रक्त पातळ होण्यासाठी उपचार सुरू असल्यास लस घेणे सुरक्षित आहे का *
उत्तर: लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
️ *२ आठवड्यांपूर्वी कोरोना झाला असल्यास आता लस घेता येऊ शकते का *
उत्तर: नाही, कोरोना निगेटीव्ह आल्यानंतर १५-२० दिवसांनंतर लस घ्यावी.
*कोणती लस चांगली आहे कोव्हिशिल्ड की कोव्हॅक्सिन*
उत्तर: जी तुम्हाला उपलब्ध होईल ती लस घ्यावी.
*दोन आठवड्यांपूर्वी रक्तातील प्लाज्मा दान केल्या असतील तर आता लगेच लस घेऊ शकतो का *
उत्तर: होय.
*लस घेतल्यावर रक्तदान करता येते का *
उत्तर: नाही, लस घेतल्यानंतर तुम्ही पुढील ६० दिवस रक्तदान करू शकत नाही. यासाठी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जेणे करून पुढील दोन ते तीन महिने रक्ताची कमतरता भासू नये.
*लसीचे काही दुष्परिणाम होतात का *
उत्तर: लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, इंजेक्शन घेतलेली जागा दुखणे, स्नायू दुखणे, लस घेतल्या नंतर कोरोना देखील होऊ शकतो. मात्र त्रास कमी होतो आणि मृत्यूचा धोका टळतो.
*कॅन्सरचे उपचार घेत असताना लस घेणे सुरक्षित आहे का *
उत्तर: होय मात्र लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
*लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी *
उत्तर: लस घेण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच मास्कचा वापर, सोशल डीस्टन्सिंगच पालन, वारंवार हात धुणे त्याचबरोबर 500MG ची पँरासिटीमॉल गोळी घ्यावी.
*लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी ?*
उत्तर: लस घेतल्यानंतर नेहमीप्रमाणेच मास्कचा वापर, सोशल डीस्टन्सिंगच पालन, वारंवार हात धुणे. ही काळजी घ्यावी.
*लस घेतल्यानंतर देखील कोरोना नियमांच करावे लागेल तर लसीचा उपयोग काय *
उत्तर: लस घेतल्यानंतर देखील मास्कचा वापर, सोशल डीस्टन्सिंगच पालन, वारंवार हात धुणे. या कोरोना नियमांचं करावे लागेल. कारण; लस घेतल्यानंतर देखील कोरोना होतो मात्र तुम्हाला होणारा त्रास लस घेतल्यामुळे कमी होतो आणि हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होण्याची गरज भासत नाही.
*लसीचा दुसरा डोस कधी घ्यावा, दुसरा डोस घेणे अनिवार्य आहे का *
उत्तर: होय लसीचा दुसरा डोस घेणे अनिवार्य आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस ८ आठवड्यानंतर तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस ६ आठवड्यांनंतर घ्यावा.
* Disclaimer :* आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून