(रत्नागिरी)
पावस रोडवरील फणसोप येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला रिक्षाने जोरदार धडक दिल्याने रिक्षा उलटी होऊन त्यातील 4 जण व दुचाकीवरील 2 जण असे एकूण 6 जण जखमी झाल्याची घटना घडली. धडक देणाऱ्या रिक्षा चालकावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा गणपत कीर (५६ ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, किर हे आपल्या ताब्यातील रिक्षातुन प्रवाशी घेऊन जात असताना फणसोप सडा येथे दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा पलटी होऊन चालकासह 6 जण जखमी झाले. ममता मेस्त्री (46), मोहन मेस्त्री (60), मंदार मेस्त्री (25), अनुज मेस्त्री (21, सर्व रा. गोळप, सुतारवाडी), पवन बागे (21), जितेंद्र किर (58, रिक्षा चालक) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार बेंदरकर यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार रिक्षा चालक किर याच्यावर भडविकलम 279, 337 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमीमध्ये दुचाकीस्वार पवन अशोक बागे ( २१. रा. नाचणे गुमकी ) रिक्षातील प्रवासी ममता मोहन मेसी ( ४६ ) मोहन फराम मेसी ( ६० ), मंदार मोहन मेसी ( २५ ) व अनुज मोहन मेसी ( २१ , रा. सर्व गोय सुतारवाडी ) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ७ एप्रित रोजी संशयित जितेंद्र कीर हे रिक्षामध्ये प्रवासी घेवून फणसोप वेधून जात होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास समोरील दुचाकीस्वार पवन वाणे यांच्या दुचाकीला जितेंद्र कीर यांच्या ताब्यातील रिक्षाने जोरदार धडक दिली अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.