सध्या कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता चिपळूण यामध्ये हॉटस्पॉट बनत चालला आहे. लॉकडाऊन मुळे सगळी दुकाने, हॉटेल्स बंद आहेत. अशा वेळेस होम आयसोलेट असणाऱ्या रुग्णांसाठी किंवा संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित असणाऱ्या व्यक्तींकडे पैसे असून सुद्धा भोजनाची सेवा देताना अडचणी निर्माण होतात.
अशा सर्वसामान्य कुटुंबातील मोफत जेवणाची सुविधा देता येईल का अशी संकल्पना श्री. सिद्धेश लाड आणि श्री. मनोज जाधव यांनी तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री.शेखर निकम तसेच मार्गदर्शक श्री.मिलिंद कापडी यांच्याकडे मांडली आणि आमदार श्री.शेखर निकम यांच्या नेतृत्वाने तसेच मिलिंद कापडी यांच्या विशेष मार्गदर्शनाने चिपळूणच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी अनेक मंडळी एकत्र आली यामध्ये विशेषतः श्री.उदय ओतारी, श्री.मल्लेश लकेश्री, श्री.अमोल टाकळे, श्री.सचिन साडविलकर, श्री.नदीम उंडरे, श्री. खालीद दाभोळकर, श्री.दिलीप आंब्रे, श्री.सनी भाटिया, श्री.प्रसन्न आवले, श्री.अल्हाद यादव, श्री.किसन चिपळूणकर, श्री.बिपिन कापडी, श्री.मंदार चिपळूणकर, अक्षय केदारी, श्री.मिनेश कापडी, श्री.समीर काझी, श्री.कादिर परकार, श्री.अमर सिंग, श्री.अतुल पेटकर असे अनेक कार्यकर्ते या महान कार्यासाठी एकवटले.
मोफत जेवण देताना कोणत्याही प्रकारचे फोटोसेशन न करता हा उपक्रम अविरतपणे सुरू ठेवायचा हे सर्वांनी ठरविले आणि हेल्पिंग हँड्स या ग्रुपचा उद्देश पाहून काही देणगीदारांनी देखील उस्फूर्तपणे मदत करण्याचे आश्वासन दिले त्यामध्ये श्री.अमित मिरगावकर, श्री.विजय पाथरे,श्री.पराग पुरोहित व अन्य देणगीदार तसेच ग्रुपचे कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्याने या ग्रुपने माणुसकी जपत चिपळूण शहरातील गरजू व्यक्तींना आणि कुटुंबांना घरपोच मोफत जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
या ग्रुपचे कार्यकर्ते प्रत्येक कुटुंबापर्यंत मोठ्या धाडसाने दुपारी आणि संध्याकाळी वेळेत जेवण घेऊन जातात तसेच दुसऱ्या दिवशीही किती जणांचे जेवण लागणार आहे हे देखील आपुलकीने विचारतात व त्या ठिकाणी तत्पर आणि विनम्र सेवा देतात. सदर उपक्रमाला चिपळुणातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला असून आणखी काही दाते उस्फूर्तपणे या उपक्रमाला मदत करीत आहेत. कोरोना संसर्ग काळात हेल्पिंग हँड्स या ग्रुपच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचे गरजू कुटुंब तसेच सर्व चिपळूणकर नागरिक यांच्याकडून विशेष कौतुक होत आहे.