(संगमेश्वर/प्रतिनिधी)
कोळंबे येथील युवा मित्र मंडळ आयोजित दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेत सेव्हन स्टार उक्षी संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी व आमंत्रित असे एकुण २८ संघ सहभागी झाले होते. या मध्ये रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील नावाजलेल्या संघांचा सहभाग होता.
जवळपास २५ ते २६ संघांना मागे टाकत अंतिम सामन्यांमध्ये सेव्हन स्टार उक्षी व संघर्ष कोळंबे हे दोन संघ पोहचले होते. उक्षी संघ, संघ मार्गदर्शक अब्दुल मुनाफ खतीब तसेच संघ नायक नासीर हमदारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळंबे येथे सामन्यासाठी सज्ज झाला होता.अटी-तटीच्या झालेल्या सामन्यांमध्ये उक्षी संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाने विजयी होण्याचा मान मिळवला आहे तर द्वितीय क्रमांक संघर्ष कोळंबे या संघाने पटकावला आहे. विजयी झालेल्या दोन्ही संघांना रोख रक्कम व चषके देण्यात आली.
या सामन्यामध्ये उत्कृष्ट चढाईपटु म्हणुन उक्षी संघातील मेहरान काझी याला सन्मानित करण्यात आले तसेच उत्कृष्ट पकड म्हणुन राजेश चव्हाण तर अष्टपैलु खेळाडु म्हणुन मुकद्दस काझी याला सन्मानित करण्यात आले.या खेळाडुंना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.
सेव्हेन स्टार उक्षी हा संघ नावाजलेला संघ आहे. अनेक सामन्यांमध्ये प्रथम क्रमांकाच्या बक्षिसावर आपले नाव कोरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर मुंबई सारख्या शहरातील मैदान गाजवलेला हा संघ आहे.कोळंबे येथे सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाने बाजी मारत आपला दबदबा कायम ठेवला आहे.
या कबड्डी सामन्यांसाठी पंच म्हणुन मंगेश खामकर, तेजस जोयशी, मयुर घेवडे, खाके यांनी पंच म्हणून काम पाहिले. संपुर्ण स्पर्धेच्या समालोचकाची धुरा खातु गुरुजी यांनी सांभाळली. या सामन्यांसाठी नयनभाऊ मुळ्ये,राजाभाऊ मुळ्ये, स्वप्निल मुळ्ये, चंद्रकांत चव्हाण, शंकर पवार,संजय राऊळ,खातु गुरुजी,उक्षी गावचे माजी सरपंच अन्वर गोलंदाज,जमातुल मुस्लिमीनचे अध्यक्ष इक्बाल राजापकर,सेक्रेटरी मुखत्यार काझी,वांद्री गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ नाना मयेकर,अभि नागवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.