(दापोली/ प्रतिनिधी)
दापोलीतील सारंग गावच्या मार्गावर रानगव्याचे दिसल्याने ग्रामस्थ व या मार्गावरुन प्रवास करणार्यांचे धाबे धणाणले आहेत. मुख्य मार्गावरच रानगवा प्रवास करताना दिसल्याने भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या गवा रेडयाला पकडून दूर सोडावे व ग्रामस्थांची भीतीपासून सुटका करावी अशी मागणी होत आहे.