( रत्नागिरी / प्रतिनिधि )
येथील शासकिय तंत्रनिकेतनमध्ये २०२४-२५ हे शैक्षिणक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला आहे, तरी अद्याप येथे ५० टक्केही शिक्षक वर्ग कार्यरत नाही. या महाविद्यालयात तातडीने शिक्षक भरती करावी, अशा मागणीचे निवेदन आज (३० ऑगस्ट) युवासेना कॉलेज कक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत युवासेना तालुका प्रमुख प्रसाद सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिले.
एमआयडीसी येथील विश्रामगृहात शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी शिवसेना शहर संघटक तथा युवा तालुका अधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री सामंत यांची भेट घेतली आणि वस्तुस्थिती कानावर घातली. शैक्षनिक वर्ष २०२४-२५ सुरू होवून सुमारे दिड महिने पूर्ण झाले आहेत. तरी महाविद्यालयात ५० टक्केही शिक्षक वर्ग कार्यरत नाहीत. यापूर्वी युवासेना कॉलेज कक्षाने प्राचार्याची भेट घेत अतंर्गत मूल्यमापनच्या (UNIT TEST) तारखा पुढे ढकलण्यात याव्यात अन्यथा युवासेना सेना पद्धतीने तीव्र निषेध करेल असा इशारा दिला होता. याची दखल घेत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या; परंतु विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या सर्व बाबींची दखल घेत लवकरात लवकर योग्य ते निर्देश काढत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्यामार्फत योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला आणि ‘युवा कार्यशाळा’मधून तातडीने शिक्षक भरती करण्याच्या सूचना त्यांनी संबंधीत यंत्रणेला दिल्या, तसेच असून त्याचा अहवाल देण्यासही सांगितले आहे.
यावेळी शिवसेना शहर संघटक तथा युवा तालुका अधिकारी प्रसाद सावंत, कॉलेज कक्ष जिल्हा अधिकारी पारस साखरे, कॉलेज कक्ष तालुका अधिकारी अमन विश्वास राणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.