( रत्नागिरी )
जिल्ह्यातील सर्वात मोठी रत्नागिरी मांडवी समुद्र येथे होणारी ना.उदय सामंत पुरस्कृत श्री प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी कार्यक्रम हजारोच्या उपस्थितीत आनंदाच्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली. मांडवी समुद्रावर येथे श्री प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०२४ ला रत्नागिरी शहरातील आणि तालुक्यातील अनेक गोविंदा पथकानी सहभाग नोंदवला होता. गोविंदा पथकांचा हा साहसी खेळ पाहण्यासाठी रत्नागिरीतील शहरातील हजारो संख्येने लोक मांडवी समुद्र येथे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले ते म्हणाले, देशातील साहसी खेळ म्हणून दहीहंडी खेळाकडे पाहिले जाते. हा खेळ ऑलिंपिक दर्जावरती खेळला जावा ही आमच्या सरकारची इच्छा असून त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.भविष्यात ऑलम्पिकच्या धरतीवर प्रो गोविंदा होणार करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेंन.पुढच्या वर्षीच्या मुबंईच्या प्रो गोविंदामध्ये रत्नागिरी संघाला प्राध्याण्याने नेणार असून त्यासाठी आतापासून तयारी करण्याचे आहावन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
गोविंदा पथकांबरोबर हा खेळ खेळाताना कोणत्याही दुर्दैवी घटना घडून त्यांना दुखापत होते.यासाठी महायुतीच्या सरकारने विमा देण्याचा निर्णय घेतला.रत्नागिरी मधील सर्व गोविंदा पथके चांगल्या पद्धतीने मनोरे रचण्याचे काम करतात त्यांचे करावे तेवढे कौतूक थोडे असून असे सांगत आजच्या उत्सवा निमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख राहुल पंडित, उपजिल्हा प्रमुख राजन शेट्ये, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, मनोज साळवी, विजय खेडेकर, स्मितलताई पावसकर, वैभवी खेडेकर, जमूरत अलजी, अभिजित गोडबोले,बाबा नागवेकर, बंटी किर, संजय हळदनकर, गजानन पाटील, दीपक पवार, दिशा साळवी यांच्या सहित सर्व पदाधिकारी उपस्थित होते.