( रत्नागिरी )
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी यांची जिल्हास्तरीय सभा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या आरोग्य मंदीर येथील हाॅल मध्ये उत्साहात पार पडली. सभेची सुरुवात शेख सरांनी कुराण पठणाने केली. समीर सोलकर यांनी सुंदर आवाजात हम्द गायन केले.
जिल्ह्याभरातून आलेल्या, विभाग स्तरावरील सदस्य तसेच राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच नवनियुक्त शिक्षकांचे संघटनेत मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. शाळेत उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षक ज्यामध्ये जियाऊल्ला खान बहादूरशेख उर्दू ता.चिपळूण, अजीम शेख साटवली उर्दू ता. लांजा, शराफत फकीर पिंपळी उर्दू ता.चिपळूण आणि वहीदा बुड्डू मॅडम शिरगांव उर्दू ता. रत्नागिरी यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
सभेचे प्रस्ताविक, आपले ध्येय आणि संघटनेच्या स्थापनेपासूनचा संपूर्ण लेखाजोखा सचिव मुनाफ गुहागरकर यांनी सादर केला. संघटनेच्या कार्याबाबत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी समाधान व्यक्त केले. संघटनेसाठी जिल्ह्याचे अध्यक्ष हिदायत नाईक सर जिल्ह्यातील उर्दू शाळांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि शिक्षकांच्या समस्या वारंवार जिल्हा शिक्षण विभागा पासून आमदार, खासदार, मंत्री तसेच मंत्रालयापर्यंत मांडून समस्या सोडविण्यासाठी झटत असल्याने जिल्ह्यातील अनेक शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या कामगिरीबाबत खुश आहेत.
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीत संचालक मंडळात असलो तरी चुकीच्या घडामोडींवर आपण विरोधात असल्याबाबत संघटनेने जाहीर केले. आपण शिक्षकांच्या भल्या साठी सत्ताधारी पॅनल मध्ये आहोत. चुकीला क्षमा केली जाणार नाही. या बाबत अध्यक्ष हिदायत नाईक सर यांनी संपूर्ण संघटनेला आश्वासित केले. सर्व पदाधिकाऱ्यांनी सदर विषयाचे मन:पूर्वक स्वागत केले.
जिल्ह्यात उर्दू शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्या संघटनेमार्फत पूर्ण करण्यासाठी विविध उपाय तालुकास्तरावर करावेत. तसेच आवश्यकतेनुसार जिल्हास्तर आणि राज्यस्तरावरुन आवश्यक ती मदत दिली जाईल, असे संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले. या सभेला जिल्हा भरातून बहूसंख्येने पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याने जिल्हा कोषागार शौकत कारविणकर यांनी जिल्हाभरातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे आभार मानले.