(लांजा)
समाजाप्रती दातृत्वाचे जाणीव असणाऱ्या तसेच सामाजिक हित जपणाऱ्या व्यक्ती व्यक्ती अधिकारी आणि संस्था यांच्यामुळे ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागातील शैक्षणिक संस्थांना मोठा हातभार लागतो याचेच उदाहरण एलआयसी गोल्डन जुबली फाउंडेशनच्यावतीने साटवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या रा.सि.बेर्डे माध्यमिक विद्यालय व कै. श्रू. य. बेर्डे जुनियर कॉलेज (सायन्स ) साटवली प्रशालेला टाटा विंगर स्कूलबस भेट दिली.
स्कुल बस प्रदान वितरण सोहळा प्रशालेमध्ये नुकताच पार पडला. कोविड महामारी व एस टीचा सुरू असलेला दीर्घकालीन संप यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विध्यार्थी नुकसान परिस्थिती पाहून एलआयसी गोल्डन जुबली फाउंडेश यांनी साटवली प्रशाळेला स्कुल बस देऊन समाजात दातृत्वचा आदर्श ठेवला आहे.
स्कुल प्रदान सोहळा कार्यक्रमवेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल गांगण होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एलआयसी सब डिव्हिजनल मॅनेजर कोल्हापूर (एसडीएम ) अभय कुलकर्णी यांनी एलआयसीच्या सामाजिक बांधिलकी व उपक्रमांविषयी आपले मत मांडले. देशातील सर्वात मोठी सामाजिक जाणीव असणारी संस्था म्हणून एल आय सी चा उल्लेख केला जातो “जिंदगी के साथ भी; जिंदगी के बाद भी” हे ब्रीद घेऊन आपणा सर्वांची काळजी घेण्यास एलआयसी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. एलआयसी गोल्डन जुबिली फौंडेशन तर्फे अन्य मदत लागल्यास आम्ही पाठीशी असल्याचे सांगून संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी एलआयसीचे अभय कुलकर्णी, सौ. कुलकर्णी, एलआयसी राजापूर शाखाधिकारी बुगडे, एलआयसीचे राजेंद्र भणगे, कामतेकर, खंबे, वळवी, साटवली चे सरपंच दत्ताराम सावंत, यासीन तांबे, संतोष धामणे सरपंच बे तसेच संस्था उपाध्यक्ष प्रसाद पंडित, सचिव किरण शेरे, मुंबई बांधकाम कमिटी अध्यक्ष मुकुंद कुष्टे, संस्था सदस्य राजू शेरे, युसुफ काजी, मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.