भंडारी मुळचे लढवय्ये त्यांना हाताशी धरून शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली,भंडार्यांनी प्राणप्रणाने महाराजांना साथ दिल्याचे कौतुकोदवार केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले. ते भंडारी समाजाच्या शहरातील स्वा.सावरकर नाटयगृह येथे आयोजित महाधिवेशनावेळी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, राजीव कीर, रमेश कीर, मिलिंद कीर,एस.बी.मायनाक, पुष्कराज कोले, आशिष पेडणेकर, विवेक नार्वेकर, प्रसन्न आंबुलकर, सुनील भोंगले, राजेश कोचरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी नाईक म्हणाले की, भंडारी समाजात अनेक नररत्ने निर्माण झालीत.सी.के.बोले, दानशूर भागोजीशेठ किर, धनंजय कीर, काकासाहेब सुर्वे आदी नररत्ने या भ्ाूमीत निर्माण झालीत.व्यापार, उद्योग,पोलीस,राज्यव्यवस्था, प्रशासन व्यवस्था यांमध्ये भंडारी समाजाचा दबदबा होता.आजही विविध क्षेत्रात भंडारी बांधव चमकत आहेत परंतूभंडारी समाज आपली ताकद,क्षमता, इतिहास विसरत चालला आहे.आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे विस्मरण त्याला होत चालले आहे.भंडारी समाज पुन्हा एकसंघ कसा होईल, समाजाला पुर्नवैभव कसे प्राप्त होईल याचा विचार करणे आवश्यक आहे. भंडारी समाज इतका मोठा आहे,की मोठा भाउ या नात्याने इतर समाजाला आधार देण्याची क्षमता आहे. यासाठी प्रथम आपल्याला एकजूट व्हावे लागेल. आपल्यातील झुंजारवृत्ती जागवावी लागेल, सारे मतभेद विसरून समाज एकत्र आला पाहीजे,अशी अपेक्षा नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी स्मरणिकेचे अनावरणही केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.प्रज्ञा तिवरेकर यांनी केले.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !