(रत्नागिरी)
बदलापूर येथे घडलेली घटना दुर्दैवी असून या घटनेचा निषेध भाजपा शहर महिला मोर्चाने नोंदवला. तसेच समाजात अशा घटना घडू नयेत, भगिनी सुरक्षित रहाव्यात म्हणून जाणीव जागर केला. शनिवारी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाहेर जाणीव जागर उपक्रम राबवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर शपथ घेण्यात आली. या वेळी महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील यांनी सांगितले की, हा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता, होऊ शकत नाही. महिलेला न्याय मिळाला पाहिजे, हीच भाजपची भूमिका आहे. म्हणून लाडकी बहीण, बसच्या तिकीटमध्ये सवलत, लखपती दीदी, लेक लाडकी अशा अनेक योजना महायुती सरकारने आणल्या आहेत. महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण हेच भाजपचे ध्येय आहे.
या वेळी दक्षिण रत्नागिरी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी, शहर चिटणीस सौ. संपदा तळेकर, ओबीसी जिल्हाध्यक्षा सौ. प्राजक्ता रुमडे, जिल्हा सरचिटणीस सौ. वर्षा ढेकणे, सौ. नुपूरा मुळे माजी नगरसेविका सौ. प्रणाली रायकर, सौ. मानसी करमरकर, सौ. ऐश्वर्या जठार, सौ. सायली बेर्डे, सौ. भक्ती दळी, सौ. सोनाली आंबेरकर व इतर पदाधिकारी महिला सदस्य उपस्थित होत्या