(वैभव पवार / गणपतीपुळे)
पुणे येथील संस्कार प्रतिष्ठान दरवर्षी महाराष्ट्रामधील महिलांना घेऊन अटारी (भारत पाकिस्तान ) बॉर्डर येथे भारतीय सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा उपक्रम राबवत असतात. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी संस्कार प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा संस्थापक मोहन गायकवाड व त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमामध्ये रत्नागिरी गणपतीपुळे येथून सौ लिना प्रशांत नलावडे या सुद्धा सहभागी झाल्या होत्या .