(संगमेश्वर / प्रतिनिधी)
रक्षाबंधन हा सामाजिक सलोख्याचा, ऐक्याचा विषय आहे. आरोग्य तपासणी करून सामाजिक जबाबदारी जपणारे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आरोग्य शिबिरात आले असता ओझरखोल आणि निढळेवाडी येथील गावातील महिलानी राखी बांधली. सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या वतीने आयोजित या मोफत आरोग्य शिबिराचा ४०० पेक्षा अधिक महिला आणि ग्रामस्थांनी लाभ घेतला. आजवर संपन्न झालेल्या मोफत आरोग्य शिबीराचा ४ हजार पेक्षा अधिक रुग्णानी लाभ घेतल्याचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी स्पष्ट केले.
या मोफत आरोग्य शिबिरा दरम्यान सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक आपल्या मनोगतात म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार भगव्या सप्ताहाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा आजवर चार हजार पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. असंख्य गोरगरीब वृद्ध आणि महिलांच्या डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले आहे . शिवसेना पूर्वीपासूनच राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिकाधिक भर देते, हे आरोग्य शिबिर म्हणजे त्याचेच एक द्योतक असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा हा कार्यक्रम भगव्या सप्ताहानंतर देखील असाच सुरू राहणार असल्याचे महाडिक यांनी मुद्दामून नमूद केले.
या मोफत आरोग्य शिबिराला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर, संगमेश्वर शहर संघटक वैभव मुरकर, ओझरखोल निढळेवाडी गावचे गावकर राजेंद्र जठ्यार,सिद्धेश सावंत, ओझरखोल शाखा प्रमुख सुनील जठ्यार, माजी सरपंच विनिता शिंदे, अमोल वाडकर ,संदीप जठ्यार,अनिल जठ्यार, नारायण जाधव आणि दिलीप नवेले, तसेच वाडी प्रमुख आणि मोठया प्रमाणात गावातील नागरिक उपस्थित होते.